टॉकिफाय.लाइफ का?

Talkify Mobile Illustration
मानसिक स्वास्थ्य महत्त्वाचे आहे

मन मोकळ आणि साफ असेल तर अवघा आनंदी आनंद. निवारा न झालेल्या भावनांचा भार मनाला आणि शरीराला फार त्रासदायक असतो. आणि कित्येक वेळा असे होते की आपण कोणावर विश्वास ठेऊन या गोष्टी बोलाव्यात..! आपल्याला मित्र मैत्रिणी अथवा नातेवाईक असतात पण त्याला खूप मर्यादा जाणवतात. त्यांजबरोबर सर्व गोष्टी आपण बोलू शकत नाही. सर्वात महत्वाचे हे की आपल्याला जेव्हा आवश्यक आहे तेव्हा यापैकी कोणाला वेळ असेलच असे नाही. आणि कोणी असेलच तर समोरची व्यक्ती त्या योग्यतेचा आहे का ही शंका आपल्या मनात असतेच. अयोग्य व्यक्ती बरोबर बोलणे हे जास्त त्रासदायक होऊ शकते. यातील काही गोष्टी फारच व्यक्तिगत असतात आणि त्या आपण मित्र मैत्रिणींशी बोलू शकत नाही. पण आपल्याला मनमोकळ बोलण्यासाठी कोणीतरी हवेच असते...
म्हणूनच टॉकिफाय.लाइफ वर मन मोकळे करा

सुलभता आणि किफायतशीर

आपणास मानसिक आरोग्य तज्ज्ञ मदत करू शकतात, परंतु ते सहजपणे आणि त्वरित भेटू शकत नाहीत.त्यांची फी पण नक्कीच जास्त असते. टॉकिफाय.लाइफशी तुम्ही त्वरित, सहजपणे जोडले जाऊ शकता. तुमच्याशी मानव केंद्रित, भावनिक आणि सामाजिक बांधिलकी या नात्याने सहज संवाद साधून आम्ही तुमचे मन हलके करू शकतो. हे किफायतशीर आहे.

Talkify Illustration
तुटलेपणा दूर करण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर

हा एक विरोधाभास आहे! तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे आपण आजवर इतके जोडलेलो कधीच नव्हतो. जगात कुठेही, कुणापर्यंतही, कधीही आपण पोहोचू शकतो. तरीसुद्धा, आपण माणसांप्रमाणे एकमेकांपासून इतके तुटलेले कधीच नव्हतो. म्हणूनच आम्ही येथे आहोत — तुमचं ऐकण्यासाठी, आधार देण्यासाठी आणि तंत्रज्ञानाचा वापर करून तुमच्या भावना मोकळ्या करण्यास मदत करण्यासाठी.

गुप्तता

सर्वात महत्त्वाचे हे आहे की हा संवाद पूर्णपणे सुरक्षित आणि गुप्त ठेवला जातो. तुमचे सर्व संवाद हे एन्क्रिप्टेड आहेत. बाकी इतर कोणीही ते वाचू शकत नाही. तुम्हाला कोणतेही अॅप डाउनलोड किंवा इंस्टॉल करायचे नाही आहे. ज्या व्यक्ती तुमच्याशी बोलत आहेत त्यांना सुद्धा तुमचे नाव किंवा व्यक्तिगत माहिती मिळत नाही. आम्ही थर्ड पार्टी पेमेंट गेटवेज वापरतो. पेमेंटची माहिती एन्क्रिप्टेड असते आणि आमच्या वेबसाइटवर स्टोर होत नाही. तुमचा डेटा आम्ही कोणत्याही पार्टीला विकत नाही. तेव्हा निसंकोचपणे तुम्ही आमच्याशी बोलू शकता.

ह्यूमन टू ह्यूमन कनेक्शन

कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आम्ही वापरत नाही. एक मनुष्य दुसऱ्या मनुष्याच्या भावना, स्वभावातील बारकावे समजून घेऊ शकतो आणि हेच नैसर्गिक आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता व तिचा वापर कितीही आकर्षक असला तरी मानवी संबंधामध्ये त्याचे महत्त्व नगण्य आहे. असे आम्ही मानतो. तरी आम्ही चॅट साठी बॉट वापरत नाही. यंत्रमानवाला आमच्या संवादात स्थान नाही. म्हणूनच आपला संवाद अधिक अर्थपूर्ण असतो. आम्ही तीन भाषांमध्ये तुमच्याशी संपर्क साधू शकतो (हिंदी, मराठी, इंग्रजी)

×

२४×७ आत्महत्या प्रतिबंधक हेल्पलाईन क्रमांक

जर तुम्ही मानसिक तणाव अनुभवत असाल आणि स्वतः वेदना किंवा आत्महत्येचे विचार येत असतील, तर कृपया तात्काळ मानसिक आरोग्य तज्ञांकडे संपर्क साधा. तुम्हांस मदत करण्यासाठी बऱ्याच व्यक्ती आणि संस्था तयार आहेत. तुम्ही एकटे नाही याची खात्री बाळगा.

टॉकिफाय.लाइफ ही सॅविन व्हेंचर्सची एक विशेष प्रस्तुती आहे.