
आमच्याविषयी
आम्हाला ठाऊक आहे की अंतर्गत कलह असणे हा मनुष्य स्वभाव आहे. भावनिक कोंडमार्यातून बाहेर येणे व सर्व दबलेल्या भावनांचा निवारा होणे हे निरोगी मानसिक आरोग्यासाठी आवश्यक आहे. पश्चाताप, राग, निराशा, भिती, दुःख या भावना मेंदूत साचत राहिल्यास आपले मानसिक व शारीरिक स्वास्थ्य बिघडू शकते. तुमच्या भावना मोकळ्या करण्यासाठी व तुमचे मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न करण्यासाठी आम्ही इथे आहोत. टॉकिफाय.लाइफ वर तुम्ही शांतपणे बोलू शकता. तुम्हाला कोणताही दोष न देता तुमचे स्पष्ट मत सहजपणे व सुरक्षितपणे येथे मांडता येऊ शकते. तुम्ही तुमच्या मनातील सर्व भावना येथे मांडल्यास तुमचे जीवन अधिक सुंदर, आनंदी व समाधानी होऊ शकते असा आम्हाला विश्वास आहे.